Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहाविच्या परीक्षेत फेरीलैंड शाळेचे सुयश,शंभर टक्के निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

दहावी राज्य बोर्डाचा निकाल नुकताच जहिर झाला असुन भद्रावती येथील फेरीलैंड स्टेट शाळेने आपल्या ऊत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.दहाविचा शाळेचा निकाल यावर्षी शंभर टक्के लागला आहे.सदर दहाविच्या परीक्षेत मुलिंनी बाजी मारली असुन शाळेतून पहिल्या चार यशस्वी विद्यार्थ्यांमधे चार मुलींचा समावेश आहे.शळेची तेजश्री बंडू खामनकर हिने ९२.६०टक्के गुण प्राप्त करुन शाळेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

तर,अंजली रविंद्र नागोसे हिने ९०.४०,सायली भास्कर भागवत हिने ८४.४०व तेजस्विनी राजू झोडे हिने ८०.४० टक्के गुण प्राप्त करीत अनुक्रमे दुसरा,तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय शाळेच्या त्रिशाली डुकरे ७५.२० टक्के,अल्फीया शेख ७५ टक्के तर कानन बगडे हिने ७४.४० टक्के गुण प्राप्त केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक अड. युवराज धानोरकर, सचिव वर्षा धानोरकर,मुख्याध्यापिका प्रज्ञा ठाकरे व शिक्षणवृंदाने अभिनंदन करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये