Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता

मान्सून पूर्व आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९५ (१) व २९९ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये, मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा जि. वर्धा यांचे वतीने नगर परिषद वर्धा हद्दीतील सर्व मिळकत धारकांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, मा. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मान्सून पूर्व आढावा सभेच्या सूचनेनुसार पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषद हद्दीमध्ये ज्या खासगी / सार्वजनिक / शासकिय जागेवरील अनधिकृत होर्डिंग, बॅनर व इमारतीच्या गच्चीवरील होडिंग तत्सम संरचना धारकांनी तात्काळ निष्कासन करावे. तसेच धोकादायक विद्युत / पथदिवे पोल किंवा इतर तत्सम धोकादायक संरचना व धोकादायक वृक्षांची नगर परिषद प्रशासनास माहिती कळवावी.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ (१) मधील तरतुदीनुसार जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, नगर परिषद हद्दीतील अतिधोकादायक झालेल्या सर्व शासकीय व खासगी मालकीच्या इमारतीचे तसेच ज्या इमारतीच्या बांधकामाचा कालावधी ३० वर्षापेक्षा जास्त झाला आहे. अशा सर्व शासकीय व खाजगी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन अर्धवट पडलेल्या स्थीतीत असल्यास तो भाग त्वरीत नगर परिषदेच्या रितसर परवानगीने काढून टाकावा तसेच किरकोळ दुरुस्ती असेल तर ती करुन घ्यावी. जुने बांधकाम पाडुन नवीन बांधकाम करावयाचे असल्यास, रितसर प्रस्ताव सादर करून बांधकाम परवानगी घेवून बांधकाम करावे. सदरच्या इमारती / घरे राहण्यास योग्य असल्याची खातरजमा करावी व तसा अहवाल नगर परिषद कार्यालयास जमा करावा,

ननेच नैसर्गीक आपत्तीमुळे होणारी जिवीत / वित्तहानी टाळण्यासाठी ज्या मिळकती धोकादायक आहेत त्या मिळकतीमध्ये कोणीही वास्तव्य करू नये. तसेच अशा इमारतीच्या किंवा मिळकतीच्या संबंधी घरमालकांनी / भोगवटदारांनी / भाडेकरू आपल्या कुटुंबीयांची तसेच शेजारच्या रहीवासी यांची जिवीत / वित्तीय हानी होऊ नये या दृष्टीने धोकादयक इमारतीचा तसेच ज्या इमारती / घरे दुरूस्त करून राहण्यायोग्य नाहीत अशा इमारती / घरे तात्काळ खाली कराव्यात व तिथे राहणा-या सदस्यांनी स्वतःच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करावी. अशा धोकादायक इमारतीमध्ये / मिळकतीमध्ये जर कोणी वास्तव्य केले व त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाल्यास नगर परिषद वर्धा प्रशासन जबाबदार राहणार नाही. तसेच ज्या नागरीकाची घरे नाल्यांची / तलावाच्या किनारी / लगत असलेले त्यांनी पावसाळ्यापूर्वी सुरक्षीत स्थळी आपल्या मामानासह वास्तव्य करावे, जेणेकरून अविवृष्टीमुळे जिवित/वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. अतिवृष्टीमुळे आपली जिवीत/वित्त हानी झाल्यास नगर परिषद वर्धा प्रशासन जबाबदार राहणार नाही. तसेच मान्सून पूर्व काळात (उन्हाळ्यात) अतिउष्णतेमुळे उष्मघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी उष्मघात टाळण्यासाठी नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये