Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे पथकाची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सावंगी पोलीसाना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि स्टेशनफैल वर्धा येथे राहणारा अमित सरगर यांनी सावंगी टी पॉइंट येथील रमेश साटोणे यांचे ठाकरे किचन नावाचे हॉटेल किरायाने घेतले असून तो त्या हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूची अवैधरित्या चोरटी विक्री करीत आहेअश्या मिळालेल्या माहितीवरून पंच व पो स्टॉफसह मुखबीर यांचे माहितीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता यातील नमुद आरोपी नामे अमित पुरुषोत्तम सरगर, वय 31 वर्षे रा. शिवाजी पेठ वार्ड नंबर 30 स्टेशनफैल वर्धा ता. जि. वर्धा याचे हॉटेलच्या झडतीतुन 1) 500 एम एल च्या लंडन पिल्सनर कंपनी च्या 2 बीयर प्रति बियर 300 / रु. प्रमाणे 600 / रु 2) 90 एम एल च्या देशी दारुच्या 7 शिश्या प्रति शिशी 100 /रु प्रमाण 700/ रु. 3 ) एक लाल रंगाचा काचेचा दरवाजा असलेला सहा फुटी फ्रिजर जुना वापरता किंमत 10,000/- रु. 4) एक चार फुटी डेझर कुलर किंमत 4000/- रू चा असा जु कि. 15,000 / रु चा माल विनापास परवाना बाळगुन मिळुन आल्याने फिर्यादीच्या लेखी तहरीर वरुन पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अप.क्र. 376/23 कलम 65 (ई)77 (अ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन मा. अप्पर पोलीस अधिक्षकी श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार, पो हवा वीरेंद्र कांबळे, ब.नं.482, , पो.ना. अतुल टेकाम, ब.नं. 1283, पोहवा अनिल वैद्य, ब.नं. 1399,पोहवा निलेश सडमाके, ब.नं. 1285,पोशि निखिल फुटाणे, ब.नं. 1532, पोशि अमोल जाधव, ब.नं. 282 सर्व नेमणूकिस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये