ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला

सावली तालुक्यातील साखरी येथील घटना ; सावली पोलिसांनी केला आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील साखरी येथे सुरेश मारोती भुरसे नामक व्यक्तीवर मंगेश श्रीहरी मुळेवार या इसमाने जमिनीच्या वादातून धारदार सत्तूराने प्राण घातक हल्ला केला.त्यात सुरेश भूरसे गंभीर रित्या जखमी झाले.

        सविस्तर वृत्त असे की,सुरेश भुरसे यांनी आपल्या स्व:मालकीची असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागात अर्ज केला होता.त्यात भूमी अभिलेख विभागाने जमिनीच्या प्रकारानुसार चतुर सीमा भागातील शेतकऱ्यांना जमीन मोजणीच्या दिवशी हजर राहण्याचे पत्र तक्रारदार सुरेश यांचे हाताने देण्यात आले.त्यात मंगेश मुळेवार ते पत्र न घेता वाद घालण्यास सुरुवात केली.वादाचे रूपांतर मारहाणीत झाली आणि आरोपी मंगेश मुळेवार यांनी सुरेश भुरसे याला धारदार सत्तुरने रात्रौ ८:३० वाजता वार केला त्यात सुरेश भुरसे गंभीररीत्या जखमी झाला. लागलीच जखमी सुरेशला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले.सावली पोलिसांनी आरोपी मंगेश श्रीहरी मुळेवार वय ४१ याला अटक करून भा.द.वी.कलम ३०७ /५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आली.सदरची कारवाई सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांचे मार्गदर्शनात स.पो.नी.सचिन मुसळे, अमलदार धीरज पिदुरकर,हवालदार राजेश शेंडे यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये