शेतकरी वर्ग ४ महिन्यापासून नुकसान भरपाईपासून वंचितच
पिकविमा नुकसान भरपाई संदर्भात तालुका स्तरीय तक्रार निवारण बैठक तात्काळ लावा - दिनेश चोखारे
चांदा ब्लास्ट
शेतकऱ्यांना माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे, तसेच सततच्या पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड अवकाळी पाऊस, इतर नुकसान इत्यादी नैसर्गीक आपत्तीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाले आहे. अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळालीच नाही या संदर्भात तात्काळ बैठका लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, शासन व प्रशासनाच्या आवाहानावरुन खरीप हंगाम २०२३ मध्ये कापुस, सोयाबीन, तुर, ज्वारी इत्यादी पिकाचा विमा १ रु. प्रति हेक्टर योजनेत काढला.
चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यांना माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरामुळे, तसेच सततच्या पाऊस अतिवृष्टी पावसातील खंड अवकाळी पाऊस सोनबोनवर आलेले यलोमोझक किळ रोग इत्यादी नैसर्गीक आपत्तीने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाले आहे.
विमा नुकसान पुर्व सुचना नियमानुसार ७२ तासात कंपनी कडे ऑनलाईन केली. परंतु नुकसान भरपाई ४ महिने लोटुनहो अजुनही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमापिक संरक्षणाकरीता त्याला विलंब करून शेतकऱ्यांना मानसिक त्रास व तालुक्याच्या ठिकाणी विमा चौकशीसाठी हेलपाटा वारंवार चकरा मारुन माहीती मिळत नाही. त्यामुळे आर्थीक नुकसान ही बाब अतिशय गंभीर आहे.
सोबतच अनेक शेतकऱ्यांना नुकसानीच्या अल्पमोबदला २००, ५००, १००० रु. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शासन निर्णया नुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अत्यल्प विमा, दावा रद्द, विमा मिळण्यास विलंब इत्यादी बाबी करीता विमाकंपनी तालुका जिल्हा प्रतिनीधी करुन माहीती होण्याच्या दृष्टिने व शेतकऱ्यांला हक्काचा विमा संरक्षण मिळतांना अन्याय होणार नाही. या करीता अविलंब तक्रार निवारण बैठकित खालील मुद्यांचा समावेश करुन आयोजन करण्यात यावे.
नदी काठावरील पुराने जुलै, आगष्ट, सप्टेंबर मधिल नुकसान सुचना दिलेल्या व पंचनामा झालेल्या शेतपिकाचा १००% नुकसान भरपाई मोबदला देणे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तक्रारदार शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई १ महिण्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.
चंद्रपूर तालुक्यातील पिकविमा पुर्वसुचना तक्रार जुलै, आगस्ट, सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई माहीती देणे.
पिकविमा पंचनामा सर्वे फार्म व कंपनीने नुकसान भरपाई काढलेली कॅलक्युलेशन शिट (भरपाई रक्कम) तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना पाहण्याकरीता उपलब्ध करुन देणे. आदी मागण्याचे निवेदन नुकतेच चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा, भद्रावती येथील तहसीलदार आणि तालुका पीक विमा तक्रार समिती अध्यक्ष यांना निवेदन सदर केले आहे.