Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे पथकाची अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सावंगी पोलीसाना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि मौजा सेलू काटे येथे राहणारा मदनलाल सुखचंद धुवारे व फतन सुकचंद धुवारे याच्या घरी अवैधरित्या डिझेलची साठवणूक करून डिझेलची अवैधरित्या चोटी विक्री करीत आहे अश्या मिळालेल्या माहितीवरून पंच व पो स्टॉफसह मुखबीर यांचे माहितीप्रमाणे मौजा सेलू काटे येथील धुवारे यांच्या घरी पंचा समक्ष जावुन त्यांना अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणूक केले बाबत घरजळतीचा उद्देश समजून घर जळती घेतली असता एकूण 540 लि. डिझेल, प्लास्टिक कॅन, इतर साहित्य असा जु.किं. 54,340 रू. चा माल मिळुन आल्याने आरोपी 1) मदनलाल सुखचंद धुवारे , वय 45 2) फतन सुकचंद धुवारे, वय 38 दोन्ही रा. सेलुकाटे ता. जि. वर्धा यांच्या विरुद्ध फिर्यादीच्या लेखी तहरीर वरुन पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अप.क्र. 369/24 कलम 3 , 7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सहकलम 286 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन मा. अप्पर पोलीस अधिक्षकी श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि दिलीप नागपुरे, सतिश दुधाने,पोलीस अंमलदार पोहवा निलेशसडमाके,ब.नं.1285, ,पोहवा अनिल वैद्य, ब.नं. 1399,पोशि अमोल जाधव, ब.नं. 282, पोशि निखिल फुटाणे, ब.नं. 1532 चालम पोशि सुमित, ब.नं. 257 सर्व नेमणूकिस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये