गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे पथकाची अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सावंगी पोलीसाना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि राजकमल रेस्टॉरंट अँड ढाबा येथे इस्ताक शेख राहणार सेलू तालुका सेलू जिल्हा वर्धा आपले धाब्यावर पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालकांकडून अवैधरित्या कमी दराने पेट्रोल विकत घेऊन ग्राहकांना बाजारभावाने विक्री करीत आहे अश्या मिळालेल्या माहितीवरून पंच व पो स्टॉफसह मुखबीर यांचे माहितीप्रमाणे राजकमल धाबा येथे पंचा समक्ष जावुन पाहणी केली असता धाब्याचे मागील बाजूला टिनाच्या रूममध्ये दोन प्लास्टिक डबकीत 40 लिटर डिझेल मिळून आल्याने जुमला किंमत 4560 रु. चा माल पंचायत समक्ष मौका जप्ती पंचनामा कारवाई करून जप्त केला तसेच आरोपी 1) इस्ताक मेहबूब शेख, वय 40 , रा. विकास चौक सेलू जिल्हा वर्धा यांच्या विरुद्ध फिर्यादीच्या लेखी तहरीर वरुन पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे अप.क्र. 370/24 कलम 3 , 7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सहकलम 286 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन मा. अप्पर पोलीस अधिक्षकी श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि दिलीप नागपुरे, सतिश दुधाने,पोलीस अंमलदार पोहवा निलेशसडमाके,ब.नं.1285, ,पोहवा अनिल वैद्य, ब.नं. 1399,पोशि अमोल जाधव, ब.नं. 282, पोशि निखिल फुटाणे, ब.नं. 1532 पोशि महेंद्र गिरी, ब.नं. 1593चालम पोशि सुमित, ब.नं. 257 सर्व नेमणूकिस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये