गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती चोरी करणारे 3 ट्रॅक्टर जप्त

विशेष पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दि. 16.05.2024 रोजी विशेष पथकने पो. स्टे. वडनेर हद्दीत पोहणा येथील नदी घाट व धोची येथील नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड केले असून एकूण मुद्देमाल 22,17,000/- जप्त केला आहे तसेच आरोपीं 1) चालक – मालक गौरव बंदुजी वानखेडे वय 27 वर्षे रा. पोहना 2) चालक मालक -प्रशांत नामदेव मानकर वय 38 वर्षे रा. धोची 3) चालक मालक – जयंत मोरेश्र्वर भोंगारे वय 34 वर्षे रा. धोची अटक केली आहे.

   सदर कारवाईत मुद्देमाल 1) एक नवीन निळ्या रंगाचा हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 3944 किंमत 4,00,000/- 2) एक निळ्या रंगाची क्रमांक MH 32 p 3640 ट्रॉली किंमत 1,50,000/- व 3) ट्रॉली मध्ये 1/2 ब्रास रेती किंमत 3,000/- 4) एक नवीन लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा rto passing न झालेला ट्रॅक्टर क्रमांक नसलेला किंमत 7,00,000/- 5) एक लाल रंगाची क्रमांक नसलेली नवीन ट्रॉली किंमत 2,00,000/- व 6) ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 7,000/-7) एक नवीन लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 32 AS 2196 किंमत 6,00,000/-8) एक लाल रंगाची क्रमांक MH 32 AH 6805 ट्रॉली किंमत 1,50,000/- व 9) ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 7,000/-असा एकूण किँमत  22,17,000/- चां मुद्देमाल पकडुन व आरोपी घटनास्थळावर पो. स्टे.वडनेर चे डुटी अधिकारी व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

       सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर,सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये