ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता ताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक शंकरराव तुराणकर, एम.सी.वी.सी. विभाग प्रमुख प्रा. आरजू आगलावे, प्रा. नंदा भोयर होत्या, सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
प्रा. प्रदीप परसुटकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्र वर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी मानले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.