Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील त्या १४ गावातील चार मतदान केंद्रावर पार पडली तेलंगणा लोकसभेची निवडणूक

निवडणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील वादग्रस्त मराठी भाषिक १४ गावातील नागरिकांनी चार मतदान केंद्रावर तेलंगणाची आदिलाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आज मोठ्या उत्साहात केल्याचे दिसून येते. या लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून श्रीमती सगुनाबाई आत्राम या उमेदवार आहेत तर टी आर एस या पक्षाकडून विद्यमान आमदार असलेले सकु आत्राम हे उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान खासदार असलेले नागेश गेडाम हे उमेदवार आहेत असे एकूण व इतरही काही पक्षाचे व अपक्ष असे ७ उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत. तर या निवडणुकीत तीन पक्ष मोठ्या चुरशीने लढत असले तरी काँग्रेस व भाजप मध्येच लढत असल्याचे चित्र येथील नागरिक सांगत आहेत.

भोलापठार या मतदान केंद्रावर गौरी कामतगुडा रामनगर, लेंडीगुडा,येथील नागरिकांनी ८०६ पैकी ५१५ मतदान झाले तर अंतापुर या मतदान केंद्रावर इंदिरानगर, पद्मावती, येसापुर, नारायणगुडा, या गावातील नागरिकांनी एकूण ८१० पैकी ५५१ नागरिकांनी मतदान केले तर मुकदमगुडा या मतदान केंद्रावर महाराज गुडा येथील नागरिकांनी ७१५ पैकी ४१२ नागरिकांनी मतदान केले तर परमडोली या मतदान केंद्रावर कोठा, तांडा, शंकर लोधी, लेंडीजाळा ,येथील ९१३ पैकी ५०८ नागरिकांनी मतदान केले या मतदान केंद्रावर तेलंगणातील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता १०० मीटर अंतराच्या बाहेर वाहने लावण्याची व्यवस्था केली होती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली होती व सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदान झाले या भागातील नागरिकांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या उत्स्फूर्त पद्धतीने मतदान करायला पाहिजे होते तेवढे केलेले नाहीत परंतु, येथील नागरिकांनी या तेलंगणाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला तेलंगणा मधूनच सर्व योजना मिळतात व शासन व लोकप्रतिनिधी ही आमच्या समस्या दूर करतात अशी प्रतिक्रिया मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या व मोठ्या संख्येने ७५ टक्के मतदान झाल्याचे येथील मतदान केंद्राध्यक्ष यांनी सांगितले.

“आज तेलंगणाची लोकसभेची निवडणूक मतदान झाले स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने मतदान या ठिकाणी केले आम्ही मागील महिन्यातील १९ तारखेला महाराष्ट्रातही लोकसभेसाठी मतदान केले व आज १३ तारखेला तेलंगणातील मतदान केले त्यामुळे दोन्ही निवडणुकाचे मतदान आम्ही केले आहे तरीपण महाराष्ट्र सरकार पेक्षा तेलंगणा सरकार आमच्यासाठी चांगले असल्याचे मत व्यक्त केले. 

 – दत्ता उत्तम जाधव, उपसरपंच ग्रामपंचायतअंतापुर तेलंगणा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये