Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आदेशाने पाईप लाईन टेस्टिंग सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे यांच्या प्रयत्नातून पालेबारसा येथे दिनांक २८ जानेवारी २४ ला गोशी खुर्द अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत पाणी समस्या विषयी मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.

    गोसेखुर्द प्रकल्पातील शेकडो शेतकऱ्यांचे शेतीना पाईप लाईन द्वारे पाणी मिळत नासल्यामुळे पिकांना मोठा फटका बसत होता. या बाबतीत शेतकऱ्यांचे वतीने वारवार निवेदन देऊन सुद्धा या समस्याकडे दुर्लक्ष होत होते. शेतालतील पाईप लाईन मुळे पाणी शेतीला शेवटच्या वेळी पाणी मिळत नव्हते त्यामुळं शेतातील पीक कोलमडून जात होती. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २८ जानेवारी २४ ला पालेबारसा येथे बैठक घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप लानईंची समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठीच्या सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संबधीत अधिकार्याना दिल्या.

        राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या आदेशाच पालन करीत गोषेखुर्द प्रकल्प अधिकारी यांनी दिनांक १० मे २४ ला नहरात पाणी टाकून शेतातील पाईप लाईन चेकिंग चे काम सुरू झाले आहे. ह्या बाबत पालेबारसा परिसरातील शेतकऱ्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते मान नाम विजयभाऊ वडेट्टीवार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री खुशाल लोडे यांचे अभिनंदन केले. तसेच शेतकरी सुशील डहलकार, विठ्ठल मंगर, मंगरुजी वाघरे, हरिदास वाढनकर, गोविंदा रेचनकर, भगवान धूर्वे, शामराव वाघरे, वामन दाजगाये,कांशीराम दाजगाये, राकेश मुळे, नरेश साखरे, रमेश तीवाडे, उमाकांत धुळसे, खुशाल चुधरी, दुष्यंत मंगर, यशवंत मंगर, लुमाजी भोयर, शंकर घोडमारे, इंडेव वाकडे, हेमंत धुर्वे, अरुण धूर्वे, दौलत धुर्वे यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये