Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

अस्वलीने घेतला युवकाला चावा – वेकोलि वसाहत व रामपूर गावात अस्वलाची दहशत

सावधानता बाळगण्याचे सरपंच निकिता झाडे ह्यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुका मुख्यालयापासून 4 किमी अंतरावर असलेल्या रामपूर व लगतच्या धोपटाळा वेकोली वसाहतीत अस्वलाचा धुडगूस सुरू असुन ह्यामुळे वसाहतीतील तसेच रामपूर येथिल नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून वेकोली वसाहत तसेच रामपूर येथिल काही भागात अस्वालाचा मुक्त संचार सुरू आहे. रात्रीच्या वेळी नागरी भागात अस्वल फिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच 11 मे रोजी रात्री 10:00 वाजताच्या सुमारास राजुरा सास्ती मार्गावरील सन्नी बियर बार जवळ ह्या अस्वलीने अविनाश कादासी (23) ह्या युवकाला चावा घेतल्याची चर्चा असुन रामपूर येथिल सरपंच निकिता झाडे ह्यांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरायला जाणे टाळा तसेच बाहेर जातेवेळी टॉर्च व संरक्षणासाठी एखादी काठी सोबत घेण्याचे आवाहन केले असुन वन विभागाने ह्या अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये