ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अॅन्ड टेक्नोलोजीच्या व्यवस्थापन समितीमध्ये बदल

जुन्या कार्यकारणीचे पुर्नस्थापन

चांदा ब्लास्ट

आज दिनांक ११ मे २०२४ ला सरदार पटेल मेमोरीयल सोसायटी (ट्रस्ट) च्या कार्यकारिणीची सभा व आमसभा आयोजीत करण्यात आली. यात प्रामुख्याने कर्मचा-यांच्या व इतर महत्वाच्या विकासात्मक विषयांवर चर्चा आयोजित केली होती. दुपारी ३.०० वाजताच्या कार्यकारीणी सभेला सुरुवात झाल्यावर श्री. विजय आईंचवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली. या दरम्यान श्री. विनोद दत्तात्रेय यांनी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दि. ०९ मे २०२४ रोजी पारीत केलेल्या न्यायालयीन आदेशाची माहिती कार्यकारिणी सभेपुढे ठेवली. त्यात असे म्हटले होते की, या कॉलेजचे संचालन अर्ज क. ८७/२०२० च्या अन्वये मंजूर केलेला परिशिष्ट १ ची कार्यकारिणी करेल तसेच संस्थेचे संचालन सुध्दा नुकतीच पारीत झालेली परिशिष्ट १ ची कार्यकारिणी करेल.

हे निकालपत्रक बघितल्यावर डॉ. विजय आईंचवार परिशिष्ट १ वर नसल्यामुळे सभा सोडून निघुन गेले. त्यानंतर सभेची सुरुवात होवुन न्यायालयीन आदेशाप्रमाणे या राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अॅन्ड टेक्नोलोजी_कॉलेजचे संचालन व सरदार पटेल मेमोरीयल सोसायटी (ट्रस्ट) चे संचालन श्री. शफीक अहमद, श्री. विनोद दत्तात्रेय, श्री. अरविंदजी पोरेड्डीवार, श्री. सुरेशजी पोटदुखे, श्री. जयंत वेलंकीवार, श्री. प्रशांत पोटदुखे, श्री. निनाद गड्डमवार यापुढे पाहतील असे सर्वानुमते ठरले. सभेत झालेल्या निर्णयाचे आमसभेच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले असून महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी स्वागत केले आहे. महाविद्यालयाचे नविन प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांना सुध्दा आजच्या सभेत सहयांचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच कॉलेज व संस्थेच्या बँकेसहीत सगळया निर्णयावर श्री. शफीक अहमद, श्री. विनोद दत्तात्रेय, श्री. जयंत वेलंकीवार यांच्या स्वाक्षरी राहतील असे ठरले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये