विदेशी दारू व मोपेडसह 1 लाख 37 हजारावर मुद्देमाल जप्त
स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 06/05/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, मानस मंदिर वर्धा येथे राहणारा अभिजीत ढोले त्यांच्या ताब्यातील मोपेड गाडीने लिओ पोर्ट सावंगी असोला नागपूर येथून विदेशी दारू घेऊन अभिजीत ढोले यांच्या घरी येत आहे अशा माहितीवरून त्याच्यावर नाकेबंदी करून दारूबंदी प्रो. रेड केला असता.,
आरोपी नामे अभिजीत उर्फ पप्पू नारायण ढोले वय 45 वर्ष रा. मानस मंदिर जवळ वर्धा, यांच्या ताब्यातून विदेशी दारूसह, एक मोपेड गाडी असा एकूण 1,37,600/- रुपये चा माल जप्त करून, सदरचा माल लिओ पोर्ट आसोला सावंगी नागपूर येथून आणल्याचे सांगितल्याने दोन्ही ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, श्रीकांत खडसे सचिन इंगोले, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे रामकिसन ईप्पर, प्रदीप वाघ,अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.