गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस

चोरी केल्याचे तपासात निश्पन्न ; आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दिनांक 02/05/2024 रोजी फिर्यादी नामे संदीप अरविंद उपरे वय 36 वर्ष रा. शिवाजी पार्क गेटजवळ तहसिल वार्ड, हिंगणघाट यांची दिनांक 24/04/2024 रोजी सकाळी 08.00 वा सुमारास त्यांचे ताब्यातील जुनी वापरती काळया व लाल रंगाची होंडा शाईन गाडी क्र. एम एच 32 ए आर 2783 किं. 30,000 रू ही मिलींद मोटर्स शोरूम, हिंगणघाट येथून कोणीतरी अज्ञात इसमांने मोटार सायकल चोरून नेल्याने पो स्टे हिंगणघाट येथे अपराध क्र. 577/2024 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्ह्यात डीबी पथक हिंगणघाट यांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेत असता मुखबीरद्वारे प्राप्त माहितीवरून काजी वार्ड, हिंगणघाट येथे राहत असलेल्या इसम नामे अरविंद रमन्ना वालकोंडे वय 40 वर्ष रा काझी वॉर्ड हिगणघाट यांस ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने दिनांक 24/04/2024 रोजी मिलींद मोटर्स शोरूम, हिंगणघाट येथून जुनी वापरती काळया व लाल रंगाची होंडा शाईन गाडी क्र. एम एच 32 ए आर 2783 किं. 30,000 रू चोरी केल्याचे तपासात निश्पन्न झाल्याने सदर आरोपीवर कायदेशिर कार्यवाही करणेकरीता ताब्यात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कार्यवाही मा. नुरुल हसन,पोलीस अधीक्षक सा.,मा. सागर कवडे,अप्पर पोलीस अधीक्षक सा.,यांचे मार्गदर्शनात मा. रोशन पंडित,उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट , मा. प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन मॅडम यांचे आदेशाने डीबी पथक इंचार्ज पोउपनि शरीफ शेख, पो हवा प्रशांत ठोंबरे, पो ना राहूल साठे, पो शी आषिश नेवारे, पो शी अमोल तिजारे, पो शी विजय काळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये