ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक रेड क्रॉस वर्धापन दिनानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम व संवाद सत्र

इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा आयोजित

चांदा ब्लास्ट

जागतिक रेड क्रॉस वर्धापन दिवसाचे औचित्य साधून, इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा, 8 मे हा दिवस साजरा करण्यात येत आहे, तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. विनयजी गौडा (जिल्हाधिकारी चंद्रपूर तथा अध्यक्ष रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर ) तर उद्घाटक म्हणून डॉ. महादेव चिंचोळे ( जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपाध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर ) हे उपस्थिती राहणार आहे.

              सकाळी 7 ते 8:30 वाजता मोफत बी.पी -ब्लड शुगर तपासणी आझाद बगीचा चंद्रपूर येथे होनार असून,सकाळी 9 वाजता ट्राफिक पोलीस मुख्यालयात ट्रॅफिक पोलिसांना उष्णतेच्या लाटेबद्दल जनजागृती व शक्तिवर्धक पेय वाटप होणार असून, सकाळी 10 वाजता शासकीय नर्सिंग विद्यालय चंद्रपूर येथे स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 5 वाजता डेबू सावली वृद्धाश्रम येथे आरोग्य शिबिर व फळे वाटप व संध्याकाळी 6 वाजता मातोश्री वृद्धाश्रम येथे आरोग्य शिबिर व फळे वाटप होणार आहे.

         अशा लोककल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, उपसचिव डॉ.संजय घाटे,कोषाध्यक्ष सीए शादाब चीनी,माजी सचिव डॉ. बी. एच.दाभेरे,पियुष मेश्राम, डॉ.आशिष बारदे, डॉ. कल्पना गुलवाडे ,डॉ.प्रसाद पोटदुखे, अश्विनी खोब्रागडे,अँड प्रीती सहाय यांनी आयोजित केलेला आहे तरी आपण अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर द्वारा करण्यात आलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये