ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नोकारी येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा आरोग्याकडे लक्ष देत नेत्र तपासणीवर विशेष जोर देताना दिसत आहेत. यामध्ये बैलमपूर, मानोली व जामणी यानंतर नोकारी येथील ग्रामपंचायत मध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत.

या शिबिरात एकूण ९६ वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण ७९ लोकांच्या डोळ्याचा नंबर काढून चष्मा बनविण्याकरिता पाठविण्यात आला.

पुढील १ हफ्त्यामध्ये नोकारी येथील सर्व ७९ लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहेत. तसेच मागील महिन्यात बैलमपूर, मानोली व जामणी येथील ३१२ लोकांची तपासणी करून २१८ नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आला आहेत. चष्मा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर्ती आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी माणिकडचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

या शिबिरात नेत्र चिकित्सक, चंद्रपूर ड्रॉ. पराग टेंभूर्डे व त्याच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच गांवातील सरपंच मनीषा पेंदोर व उपसरपंच वामन तुराणकर यांचे मोलाचे सहकार्य मिलाले आनी त्यांनी माणिकढचे या उपक्रमाबद्दल विशेष आभार मानलेत.

या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस.आर. टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये