ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे ०१ मे महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

        महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाबाळ पा.संगिडवार यांचे हस्ते संपन्न झाले.महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम,संत रामदास,संत ज्ञानेश्वर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे महाराज यासारखे अनेक संत होऊन गेलेत त्यांनी एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला. महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले त्यांनी आपल्या लेखनातून संपूर्ण विश्वाला चांगला संदेश दिला असे माणसे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे असे विचार विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी प्रास्ताविकेतून मांडले.मंचावर प्रमुख पाहुणे मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,मार्गदर्शक शरदचंद्र पोहनकर,संजय ढवस,किशोर संगीडवार,शेखर प्यारमवार उपस्थित होते.

       महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे संचालन धनंजय गुरनुले यांनी केले तर आभार भुजंगराव आभारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये