ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकृतपणा! ९ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका ९ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवारला उघडकीस आली. या प्रकरणी २२ वर्षीय विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

          प्राप्त माहितीनुसार, ९ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो. आठ दिवसांपूर्वी त्याच्या घराजवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने घराजवळील झुडपात नेऊन त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. २८ एप्रिल रोजी त्या बालकाची आई पाणी भरीत असताना तिला घराजवळील लहान मुलांचे बोलणे ऐकले. तिने घरी येऊन आपल्या मुलास विश्वासात घेऊन चौकशी केली असता २२ वर्षीय तरुणाने आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले. लगेच त्या मुलाचे आई वडील तसेच परिसरातील महिला पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली.

       पोलीसांनी कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम ३७७, ३६३, ५०६, पोस्को ४, ८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये