ताज्या घडामोडी

अपघातात गंभीर जखमी युवकाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बल्लारपूर – राजुरा बल्लारपूर महामार्गावर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्धा नदी जवळ 26 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एक युवक गतिरोधकावरून MH 33 E 54 बजाज सिटी 100 ह्या दुचाकीवरून पडुन झालेल्या अपघातात युवकाच्या डोक्यावर जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे चमुसह घटनास्थळी पोहचले व गंभीर जखमी युवकाला तत्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

युवकाची स्थिती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात असुन अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. युवक बेशुद्ध असल्याने पोलिसांना त्याची ओळख पटविणे अवघड होत असल्याने अंदाजे 45 ते 50 वर्ष वयाच्या रंग -काळा उंची -5 फूट 5 इंच, बांधा सुदृढ, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट तसेच दाढीचे केस पांढरे झालेले अशा वर्णनाच्या युवकाची पोलीस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असुन नागरिकांनी सदर युवक ओळखीचा असल्यास त्याच्या नातेवाईकांना तसेच  पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे ह्यांना मोबाईल क्र. 9860601816, वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये