ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवकांनी वृद्ध व अपंग मतदारांची केली सेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी विधान सभा मतदार संघात ‘मतदार मित्र’ म्हणून 40 रोव्हर्स-रेंजर्स व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे वृद्ध, अपंग व आजारी मतदारांना मतदान कक्षापर्यत पोहचविण्याचे प्रशंसनीय कार्य केलेले आहेत.

रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळीचे एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवक, पुलगाव येथील ज्ञान भारती कनिष्ठ महाविद्यालय व वायगाव येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी देवळी मतदार संघातील 55 मतदार केंद्रावर स्वयंसेवक म्हणून आपली मदत स्थानिक प्रशासनाला केलेली आहे.

या मतदान केंद्रांमध्ये देवळी शहर, चिकणी, जामणी, पडेगाव, दुरगडा, भिडी, कोल्हापूर, सोनेगाव आबाजी, वायगांव, तळेगाव व पुलगाव मतदान केन्द्राचा समावेश होता. स्वयंसेवकांमध्ये आदर्श नाईक, मनोज नेहारे, कोमल शितळे, अस्मिता दडांजे, रविना मून, राखी खोडे, वैष्णवी शिरभाते, आकाश कन्नाके, तेजस धोटे, समिक्षा मराठे, नयन तुमसरे, अपेक्षा नेवारे, निखील मेश्राम, देवीका मगरे, अनुश्री खंडरे, रितेश भुजाडे, रोहीत राठोड प्रथमेश खडसे, प्रतिक्षा पाटमासे, प्रांजली फटींग, अभिलाषा तरवडकर, रेणू हिवरकर, ॠतीक कोहळे, यशवंत विश्वकर्मा, प्रज्वल वाघमारे, साहील गुजरकर, विशाल पवार, भूषण ठोबंरे, हर्ष तेलंगे, प्रफुल्ल हेंडवे, किरण ठाकरे, अब्दुल झाकीर, हितेश भांगे व पूनम डांगरे यांचा समावेश होता.

रासेयो स्वयंसेवकांना सदर मदत कार्य करण्याकरीता प्रोत्साहन देण्याकरीता रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहन गुजरकर, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. विलास बैलमारे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. रविंद्र गुजरकर, यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश भोमले, प्रा. विनोद मेंढे व ज्ञान भारती कनिष्ठ महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. श्वेता मोरे यांनी सहकार्य केले.

सहभागी स्वयंसेवकांच्या सेवा कार्याबद्दल अनेक मतदारांनी, स्थानिक लोक प्रतिनिधींनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केलेले असून सर्वाना प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये