ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांचे थकबाकी बील लेखा विभागात सादर करण्यास शिक्षण विभागाची टाळाटाळ

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची मग्रुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

 सावली पंचायत समितीतील शिक्षकांचे प्रोत्साहन भत्ता थकबाकी ची रक्कम मार्च २०२४ ला मिळावी म्हणून शिक्षकांनी शिक्षण विभागातील लीपिकाना मदत करून बिल व विवरण पत्र तयार करून दिले परंतु शालार्थ प्रणाली कर्मचारी जि प चंद्रपूर यांनी आयडी मंजूर न केल्याने निधी परत गेला. आता पुन्हा २४ एप्रिल २०२४ च्यां पत्रानुसार थकबाकीची मागणी करणारे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.

मात्र, शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी अजूनही लेखा विभागात थकबाकी चे बील सादर केलेले नाहीं. त्यामूळे यावेळेस सुद्धा सावली पंचायत समितीतील शिक्षक थकबाकी पासून वंचित राहतील असे दिसुन येत आहे. याला पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचारी सर्वस्वी जबाबदार आहेत अशी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप आहे. आदिवासी क्षेत्रातून आलेल्या शिक्षकांची वेतन निश्चिती झालेली आहे मात्र वेतन निश्चिती पडताळणी साठी मुळ सेवापुस्तक जिल्हा परिषद लेखा विभागात पाठविण्यास शिक्षण विभागातील कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत.

अशा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकिद देऊन कार्यवाही करावी अशी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची मागणी आहे. अनेक शिक्षकांचे वार्षिक वेतनवाढ नोंदी घेतलेल्या नाहीत. अर्जित रजा मंजुरी आदेश दिले जात नाही, वेतन स्लीप किंवा वेतनाची माहिती दिली जात नाही, शिक्षण विभागातील कर्मचारी एकमेकांवर कामे ढकलतात. शिक्षकांची कामे करण्यास टाळाटाळ करतात परिणामी शिक्षकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. बऱ्याच शिक्षकांचे मुळ सेवापुस्तक अद्यावत केलेले नाही. शैक्षणीक अर्हता मंजुरीचे नोंदी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार संघटनेकडे येत आहेत.

तरी अशा कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी संघटनात्मक मागणी जोर धरीत आहे. तसेच यानंतर माहिती अधिकारात माहिती मागणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे

     पंचायत समिती सावलीत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे मूळ सेवा पुस्तक अद्यावत नाहीत. प्रोत्साहन भत्ता थकबाकी विवरण शिक्षकांनी मदत करून तयार करून दिले पण लेखा विभागात सादर करण्यास शिक्षण विभागाचे कर्मचारी टाळाटाळ व टोलवाटोलवी करीत आहेत परिणामी निधी परत जाईल याला दोषी शिक्षण विभागाचे कर्मचारी असतील.

        जीवन भोयर

अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना सावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये