ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणात दारूची अवैध वाहतूक करतांना एकास अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- तेलंगणात रेल्वे गाडी ने दारू ची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमास अटक केले.

        बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना रेल्वे सुरक्षा दलाचे शिपाई यांनी माहिती दिली की रेल्वे स्टेशन जवळील पडीत क्वार्टर जवळ एका इसमास रेल्वे सुरक्षा दलाचे अंमलदार पवन कुमार यादव जवळ बॅग घेऊन उभा होता. बॅग ची तपासणी केली असता त्यात १५० नग देसी दारू संत्रा रॉकेट ९० मि.ली. किंमत ५२५० रुपये चा मुद्देमाल आढळून आले. सदर आरोपी नामे रूपेश नानाजी रामटेके वय २७ वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड यास अटक करून ६५ (ई) मुंबई दारू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केले.

       सदर कारवाई पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, चापोशी कैलाश चींचोळकर तसेच आरपीएफ चे उपनिरीक्षक प्रवीण गाढवे व अंमलदार पवन कुमार यादव यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये