ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. उत्कर्ष मून यांचे संशोधन ठरणार संत्रा शेतीसाठी वरदान   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गाँधी कॉलेज ऑफ़ सायन्स गड़चांदुर येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागायचे सहाय्यक प्राध्यापक तसेच जैवतंत्रज्ञान व आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. उत्कर्ष मून यांनी “सायन्स एंड इंजीनियरिंग रिसर्च बोर्ड, नवी दिल्ली” या शासकीय संस्थेची २०२२-२४ या साली २० लक्ष रुपयांची रिसर्च ग्रांट मिळवली होती. त्यांचे संशोधन नागपुर संत्रा व असम निम्बू या फळावर असून त्यांनी या रिसर्च ग्रांट च्या सहाय्याने महात्मा गाँधी कॉलेज ऑफ़ सायन्स गड़चांदुर येथील जैवतंत्रज्ञान विभाग येथे रिसर्च लेबोरेटरी बनवली आहे.

नागपूर संत्री या झाडांवर आढळणाऱ्या रूट रॉट व गमोसीस हे रोग फायटोप्थोरा या बुरशी मुळे पसरते. डॉ उत्कर्ष मून यांना, असम निम्बूच्या सालीपासून फायटोप्थोरा या बुरशीला आटोक्यात आणणारे औषध गुण शोधून काढण्यात यश आले आहे. त्यांच्या या संशोधनाची सर्वत्र चर्चा होऊन त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. व लवकरच या औषधी गुणांचा वापर संत्रा झाडांवर फवारणी द्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करता येईल असे त्यांनी आश्वासन दिले. त्यांच्या या कार्या साठी प्राचार्य, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंदानी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

डॉ उत्कर्ष मून यांना २०१९ साली माइक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया तर्फे “यंग सायंटिस्ट अवार्ड” देऊन गौरविण्यात आले होते. त्यानी आपले एम टेक व पीएचडी चे शिक्षण आय आय टी खड़गपुर येथून पूर्ण केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये