ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चैत्र पौर्णिमेनिमीत्य येणाऱ्या भाविकांना एस.टी. बसेसची सूविधा

चांदा ब्लास्ट
चैत्र पौर्णिमे निमीत्य दि. २०/०४/२०२४ ते २६/०४/२०२४ या कालावधीत यात्रा भरणार असून यात्रेचा मूख्य दिवस मंगळवार दि. २३/०४/२०२४ हा आहे. सदर यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांकरीता चंद्रपूर विभागाकडून एस.टी. बसेसची सूविधा करण्यात आली आहे. बागला चौक चंद्रपूर, न्यु इंग्लीश ग्राउंड, चंद्रपूर व आदीलाबाद (तेलंगाणा प्रदेश) येथून यात्रा बसेसची व्यवस्था राज्य परीवहन महामंडळाकडून प्रवाशांचा सेवेकरीता करण्यात आली आहे.
तरी भावीकांनी राज्य परीवहन महामंडळ चंद्रपूर यांचेकडून सदर यात्रेनिमीत्त जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली असल्याने याचा पूर्णपणे लाभ घ्यावा.



