ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील तरुणांना आदमी पक्षाचे आकर्षण – सुरज ठाकरेंच्या नेतृत्वात युवकांनी केला पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जन आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाबद्दल महाराष्ट्रातील युवकांमध्ये आकर्षण निर्माण होत असुन मागील जवळपास दहा वर्षांपासून दिल्ली व तीन वर्षांपासून पंजाब राज्यात सत्तास्थानी असलेल्या पक्षाने आपली पाळेमुळे देशाच्या सर्व भागात रुजविण्याचे काम जोमाने सुरू केले असुन महाराष्ट्रातही ह्या पक्षाबद्दल व अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वबद्दल युवकांमधे आकर्षण निर्माण होत असुन आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राजुरा तालुक्यातील चुनाळा व बामनवाडा येथील तरुणांनी अनिकेत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आम आदमी पार्टी व जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश केला. ही कामगार संघटना सुरज ठाकरे ह्यांनीच स्थापन केली आहे हे विशेष.

आगामी विधासभा निवडणुकीत सुरज ठाकरे सारखे तडफदार, युवा धाडसी नेतृत्व राजुरा विधानसभेतुन निवडून पाठविण्याची जिद्द बाळगुन आपण आम आदमी पक्षात प्रवेश केला असुन राजुरा विधानसभा क्षेत्र पक्षाला महाराष्ट्रातील पहिला आमदार देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आलटुन पालटुन सत्ता भोगणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजुरा क्षेत्राचा हवा तसा विकास घडवुन आणला नाही उलट स्वतःच्या तुंबड्या भरल्या, मतदारांवर घराणेशाही लादण्याचा प्रयत्न ह्या नेत्यांनी सातत्याने केला असुन क्षेत्रातील मागासलेपणा तसेच बेरोजगारी कमी करण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरल्यामुळे तसेच सुरज ठाकरे ह्यांच्या धडाक्याने अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळत असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनिकेत मेश्राम, यांच्या पुढाकाराने तरुणांनी आम आदमी पार्टी व जय भवानी कामगार संघटनेमध्ये प्रविन नगराळे, चेतन बक्षी, मयुर गेडाम, प्रणित नगराळे, आदर्श नगराळे, हामता नगराळे, आशिष तांडी, देवा मंदारे, महाराज, अमन लोणार, मनोज नगराळे, संकेत नगराळे, संस्कार विधाते, गुरुदास देवाळकर, कवडु दरवेकर, मंगेश टेकाम, सोनु नगराळे, भसारकर, गोलु कोडापे, राकेश टेकाम, अभय अवधुत, प्रविन डेकोटे, देवा कुंभे, अबुल मावलीकर, शिवम दश्वैकर, मुगात वाघमारे, लव डिंगे, कूश डिंगे, विपुल आत्राम, सचिन टेकाम, अमन नगराळे, अंशर पूणेकर, दादु कोडापे, संकेत कोडापे, आदित्य भसारकर, विमुश ताडे, रोहित नगराळे, उदय नातारवार, लरून नातारवार, वैभव देवाळकर, सुरेश वाघमारे, दर्शन नगराळे, सुमित दोंगडे, अनिल तांडी, श्यमू, अंजी रोबलावार, गणेश सोयाम इत्यादी तरुणांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रोशन बंडेवार, महेश ठाकरे, प्रतीक्षा पिपरे, सरिता कोंडावार, राहुल चव्हाण उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये