ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिमस बँकेमार्फत पिक कर्ज वाटप सुरू शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट

सन २०२४-२५ या खरीप पिक कर्जवाटपाचे हंगामात बँकेकडुन १ एप्रिल २०२४ पासुन पिक कर्जवाटप सुरू झालेले असून शेतकरी बांधवांनी पिक कर्जाची उचल करून लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर जिमस बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हयात दरवर्षी शेतकरी बांधवांना पिक कर्जवाटप करतांना लिड बँकेने दिलेल्या उद्यीष्टांची आपली बॅक १००% पूर्तता करून दरवर्षी शेतकरी बांधवांना पिक कर्जवाटप करीत आहे. मागील वर्षात ठरवून दिलेल्या उद्यीष्टापेक्षा २०० कोटीने जादाचे कर्जवाटप केलेले आहे.

यावर्षी शाखांमार्फत पिक कर्जवाटप सुरू झालेले आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या संलग्न वि.का. / आदि. / सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव, बॅक निरीक्षक यांचेशी संपर्क साधुन आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून पिक कर्जास पात्र व्हावे व त्वरीत पिक कर्जाची उचल करून शेतीउपयोगी सामान, बि बियाणे, खते याचा ताळमेळ बसवावा असे चंद्रपूर जिमस बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये