ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृक्षारोपण करून स्व. प्रा. वगरकर सरांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : स्थानिक यशवंत महाविद्यालयाचे इंग्लिश विषयाचे माजी प्राध्यापक स्व. प्रमोद वगरकर यांच्या जयंतीनिमित्त 21 एप्रिल रोजी निसर्ग सेवा समितीच्या ‘ऑक्सिजन पार्क’ परीसरात बेलाचे रोपटे लावून वगरकर कुटुंबीयांनी श्रद्धांजली अर्पण केली.

श्रीमती साधना वगरकर व कन्या ॠचा वगरकर मांजरखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शोभाताई कुपटेकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रा डाॅ. राजेंद्र मुंढे, प्रहार संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर, विजय भोयर, बाळकृष्ण हांडे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्व. प्रमोद वगरकर यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ते इंग्लिश विषयाचे कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक असून इंग्लिश साहित्याचे अभ्यासक होते. ते विदर्भ इंग्लिश प्राध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविलेले आहे.

श्रद्धांजली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॠचा वगरकर मांजरखेडे यांनी करून त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला व दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा संकल्प व्यतीत केला.

संचालन कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर आभार मुरलीधर बेलखोडे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये