ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथ. शाळा लालगुडा येथे ‘विद्यार्थी दिवस’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना पंचायत समिती अंतर्गत गडचांदूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

विद्यार्थी कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांचे शैक्षणिक अनुभव, गोष्टी,विद्यार्थी जीवन संघर्ष,इत्यादी मनोगत शाळेचे शिक्षक श्री गोविंद पेदेवाड यांनी व्यक्त केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री बोबडे सर यांनी विद्यार्थी हा स्वयंशिस्त,अभ्यासू,जिज्ञासू वृत्ती आदी गुणांनी परिपूर्ण असावा असे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा विद्यार्थी प्रतिक मंगल तोडासे याने तर आभार प्रदर्शन कु. दिशा फकरू मरस्कोल्हे या विद्यार्थिनीने केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये