Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात “महसूल पंधरवाडा” साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दिनांक 8 -8 -2024 रोजी “महसूल पंधरवाडा” तहसील कार्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके, प्रमुख पाहुणे अकनुरवार साहेब, नायब तहसीलदार भद्रावती, प्रमुख मार्गदर्शक राऊत साहेब, नायब तहसीलदार, भद्रावती, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर ए. बी. धोटे व कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे उपस्थित होते.

 याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकेतन प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे यांनी महसूल पंधरवाडा विषयी माहिती सांगून कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू स्पष्ट केला.

तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अकनुरवार साहेब यांनी 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवड्यात कोणकोणते कार्यक्रम राबविण्यात येतात यावर सविस्तर माहिती दिली त्यांनी शासनातर्फे कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जातात तसेच या सर्व योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.

 तर प्रमुख पाहुणे श्री राऊत साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा बाबतची सविस्तर माहिती व शासनातर्फे स्पर्धा परीक्षेकरिता संदर्भात गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जातात यावर प्रकाश टाकला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी युवक देशाचे आधारस्तंभ आहे तेव्हा सर्व नव-मतदार विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार फॉर्म भरून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे आवाहन केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेद्रे, प्राध्यापक देवानंद भवरे व प्राध्यापक कुंदन शहारे यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे यांनी केले.

 या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये