ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील बोथली परिसरातील वोडाफोन टॉवरमध्ये बिघाड

ऑनलाईन कामे करताना अडचणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

          सावली तालुक्यातील बोथली गावामध्ये असलेल्या वोडाफोन टॉवरमध्ये मागील एक महिन्यापासून बिघाड आल्यामुळे वोडाफोन चे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

   गावात वोडाफोन चे टॉवर असल्याने परिसरातील नागरिकांसह गावातील नागरिक,सेतू केंद्र,ग्रामपंचायत,आरोग्य केंद्र, जी.प.शाळा आणि माध्यमिक शाळा या सर्वांनी आपआपल्या सोईसाठी वोडाफोनचे सिम घेऊन ऑनलाईन कामात कोणतीही अडचण जाणार नाही असे वाटत असताना मागील एक महिन्यापासून टॉवर बंद असल्याने गावातील कार्यालयात नुकत्याच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना परिसरातील लाडक्या बहिणीला अडचणीचा सामना करावा लागत आहे.मागील एक महिन्यापासून वोडाफोन ची सेवा बंद असल्याने परिसरातील नागरिक ऑनलाईन कामाकरीता तालुक्याच्या ठिकाणी येऊन करताना दिसत आहेत,त्यामुळे त्यांना आर्थिक,शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

 वोडाफोन अधिकारी वर्गाला ही बाब तेथील स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगून आणि तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.आज करू,उद्या करू असं म्हणत असताना तब्बल एक महिना लोटूनही दुरुस्ती करून देत नसल्याने परिसरातील नागरिकांची बोंब आहे.

सदर समस्या ही गंभीर असून अधिकारी वर्गांनी या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन खंडित व्होडाफोन सेवा सुरळीतपणे चालू करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये