ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजाची तस्करी करणाऱ्या ३ आरोपीना बल्लारपूर येथे अटक

चांदा ब्लास्ट

आगामी लोकसभा निवडणुकीचा पाश्वभुमीवर आदर्श आचार संहिता सुरु असतांना अवैधरीत्या अंमली पदार्थ (गांजा) बल्लारपुर येथुन तेलंगाणा येथे रेल्वेनी जाणार असतांना रेल्वे स्टेशन बल्लारपुर येथिल एस.एस.टी. पाईंट वरील चेकींग कर्मचारी यांनी झडती केली असता दरम्यान बल्लारपुर पोलीसांना १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता चे कारवाई केली असता ९३९ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) व गांजा नेण्यासाठी उपयोगात आणलेल्या दोन स्कुल बैंग असा एकूण ९ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपी राजेश नायक बाबुराव घुगलोत (२९) रा. रामगुंडम जिल्हा-करिमनगर, वामशी अवनीधर गाजुला (२२) रा. हॉयटेक सिटी रोड नं.२ मंचेरियल जिल्हा-मंचेरियल राज्य- तेलंगाणा, अरबाज शफी खान (२३) रा. तिलक वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.३८०/२०२४ कलम-८ (क), २०(ब), (ii) (अ), २१ एन.डी.पि.एस. ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बल्लारपुर येथून तेलंगाणा येथे रेल्वेनी अंमली पदार्थ (गांजा) वाहतुक करित असतांना गांजासाठा जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आह. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडचार, सफौ गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, आंनद परचाके, बाबा नैताम, संतोष दंडेवार, पो.अं. शेखर माथ हूनकर, वशिष्ठ रंगारी, शरदचंद्र कारुष, लखन चव्हाण व एस.एस.टी. पाईट वरील पोअं. दयाल कुकुडकर व महसुल स्टॉफ यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये