धानोली तांडा येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे ताब्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील धानोली तांडा येथे देशी दारूची दुचाकीनी तस्करी करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कोरपना पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई गुरुवार दिनांक अकराला सायंकाळी करण्यात आली.
धानोली तांडा येथील टी पॉईंट वर दोन दुचाकी द्वारे अवैध रित्या देशी दारू आणली जात आहे. अशी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सापळा रचून वाहने थांबून तपासणी केली असता. त्यांच्याकडे २०० नग देशी दारू ने भरलेल्या प्रति किंमत अंदाजे ३५ रुपये एकूण सात हजाराचा माल आढळून आला. तसेच यासोबत हिरो होंडा स्प्लेंडर व फॅशन दुचाकी ही प्रत्येकी किंमत तीस हजार रुपये असा एकूण ६७ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई कोरपना चे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश वाघ, गणेश डवरे, बळीराम जाधव, सैनिक, उमेश भिवापुरे व कोरपना पोलिसांनी केली. या कारवाईमुळे अवैध रित्या देशी दारूची विक्री करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.