ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे बेमुदत संप

राज्यातील ग्रामपंचायती होणार ऑफलाईन ; गट विकास अधिकारी यांना संपाबाबत निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक हे शासन आणि ग्रामस्तरावरील जनता यामधील महत्वाचा दुवा असून संगणक परिचालक हे मागील 12 वर्षापासून आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात 27000 ग्रामपंचायतीमध्ये 1 ते ३३ नमुने ऑनलाईन करणे,महाईग्राम,ई-ग्रामसोफ्ट,एरिया प्रोफाईल, सी.आर.एस जन्म मृतू अहवाल,सर्विस ऑनलाईन साफ्टवेअर मध्ये माहिती अद्यावत करणे तसेच ग्राम सचिवाला वेळोवेळी पत्र,ठराव,प्रस्ताव,वेगवेगळे अहवाल तयार करून देणे शासनाने वेळोवेळी मागितलेली माहिती,याद्या तत्काळ शासनापर्यंत पोहोचविणेचे कामे तसेच संगणकाद्वारे संगणीकरण करून ग्रामस्तरावरील जनतेला विविध दाखले,प्रमानपत्र,महसुली सेवा तसेच पिक विमा,आयुष्यमान,ई-श्रम, महात्मा फुले कर्ज माफी योजना,प्रोत्साहन योजना,घरकुल योजना,बँकिंग सेवा, शासनाच्या राबविण्यात येत असलेल्या विविध प्रत्येक ऑनलाईन सेवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेपर्यंत संगणक परिचालक पुरवीत आहेत.

       परंतु शासनाने आपले सरकार प्रकल्पाची हाताळणी CSC-SPV या कंपनीकडे दिलेली असून याच कंपनी मार्फतीने संगणक परीचालाकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे.व हि कंपनी संगणक परिचालक यांची पिळवणूक करून केवळ रु. 6930 येवढे तुट पुंजे मानधन देत असून पाच-पाच महिने मानधन सुद्धा मिळत नाही.येण दिवाळीच्या तोंडावर कंपनी मार्फत मानधन वेळेवर न मिळल्याने संगणक परिचालक यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. CSC-SPV कंपनी टार्गेट च्या नावाखाली बोगस दाखले,प्रमाणपत्र काढायला लावणे,केलेल्या कामाचे मोबदला न देता शासनाच्या अन्य विभागाकडून ग्रामविकास विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अतिरिक्त कामे विना मोबदला करून घेणे.सुधारित आकृती बंधात सामाविस्ट करण्यासाठी वेळ लागत असल्याने संगणक परिचालक यांचेमध्ये असंतोषाची लाट पसरलेली आहे.

   शासनाने संगणक परिचालक यांना आकृतीबंधात समावेश करून दर महिन्याला निश्चित तारखेस वेतन देण्यात यावे,आकृतीबंधात सामाविष्ठ करण्यास विलंब लागत असल्यास किमान मासिक 20,000/- इतके वेतन वेळेत देण्यात यावे,नियमबाह्य कामे सांगताना ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊनच कामे सांगण्यात यावे व त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा,कामाचे टार्गेट सिस्टम पूर्णपणे बंद करण्यात यावे.मागील थकीत मानधन तत्काळ द्यावे, या मागण्या घेऊन राज्यातील 27000 संगणक परिचालक सहित सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक 13 नोव्हेंबर 2023 पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन तसेच विविध आंदोलने करीत असून बेमुदत संपावर जाणार आहेत.याबाबतचे निवेदन गट विकास अधिकारी पं.स.सावली यांना देण्यात आलेले आहे.

       याप्रसंगी संगणक परिचालक संघटना तालुका अध्यक्ष,निलेश पुटकमवार,उपाध्यक्ष राकेश मुळे सचिव प्रशांत घोडे,नितीन डोंगरे मुलीधर देशमुख,सुरज गोटपतीवार्,निखिल चापले, प्रशांत दिवटे,प्रशांत भुरसे,तसेच सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये