ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर                 

बॅडमिंटन हॉल व शुटींग रेंजचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्ह्यात उत्तम दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत. स्पर्धेच्या युगात इतरांच्या तुलनेत आपले खेळाडू कुठेही मागे राहू नये, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉल व शुटींग रेंज अद्ययावत क्रीडा सुविधेचे पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम आदी उपस्थित होते.

खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाच्या आधुनिकतेवर भर देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक धावनपथ, पॉलीमर ग्रास फुटबॉल मैदान तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच बॅडमिंटन व शुटींग हॉलचे अपग्रेडेशन करण्यात आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणे वर्धा तालुका क्रीडा संकुलात देखील धावनपथ, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, रिटर्निंगहॉल, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा निर्माण केल्या असून नैसर्गिक वातावरणात अनेक खेळाडू क्रीडा सुविधेचा लाभ घेत असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

बॅडमिंटन हॉल व शुटींग हॉलच्या नुतनीकरणामध्ये संपूर्ण छताचे नवीन पत्रे बसविणे, चारही वुडन कोर्टचे वुडन काढून नवीन बसविणे. संपूर्ण हॉल व हॉलच्या बाहेरील रंगरंगोटी करणे, विद्युतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुरुवातीला पालकमंत्री व मान्यवरांनी बॅटमिंटन हॉल व शुटींग रेंज अद्ययावत क्रीडा सुविधेचे फित कापून लोकार्पण केले. कार्यक्रमास क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये