“मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणा-या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
माननीय श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 27 जानेवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा कारला चौक वर्धा येथे सापळा रचुन होन्डा सिटी कार क्रमांक MH-29/AB-7117 वर रेड केला असता, आरोपी राजेंद्रसिंग उर्फ गुड्डु लखनसिंग जुनी, वय 32 वर्ष, रा. हनुमानगड गिरीपेठ कारला चौक वर्धा हा मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थाची वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, त्याचेवर कार्यवाही करीत त्यांचे ताब्यातुन निव्वळ 07 ग्रॅम 65 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ, मोबाईल व कारसह जु.कि. 10,41,775 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी व त्यास अमली पदार्थाचा पुरवठा करणारा नागपुर येथील एका ईसमाविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि.निशांत फुलेकर,पो.उपनि. विजयसिंग गोमलाडु, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली



