ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनां निमित्ताने वाहतूक नियमांचे पालन करावे या करिता वाहतूक विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्या सयुक्त विद्यमाणे हेल्मेट रेल्ली चे जनजागृतीपर आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 26/01/26 रोजी प्रजासत्ताक दिन निमित्ताने वाहतूक नियंत्रण शाखा आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सयुक्तपणे वर्धा जिल्ह्यात अपघातयाचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता सर्वांनी हेल्मेटचा वापर करावे, सीट बेल्ट चा वापर करावे. दारू पिऊन वाहन चालवू नये. गाडी चालवीतना मोबाईल चा वापर करू नयेत असे सूचना फलक घेऊन पब्लिक अलाऊन्स सिस्टीम चा वापर करून वाहन चालक व नागरिकांन मध्ये वाहतूक कायद्या बाबत जनजागृती ही करण्यात आली

सदर रेल्लीस सुरवात ही अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे सर आणि Dy RTO स्नेहा मेंढे मॅडम यांनी हिरवी झेंडी दाखवून केली तसेच RTO निरीक्षक अनुराधा जाधव मॅडम, इंद्रजित मदने सर, व इतर सर्व सहकारी, तसेच स्कुल बस, मोटार ड्राइव्हिंग स्कुल सन्घटना यांनी या रॅली मध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस निरीक्षक विलास पाटील पोउप नि अमोल लगड यांनी सहभाग घेवून मार्गदर्शन केले,

रेल्ली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरुवात होऊन बजाज चौक, शिवाजी महाराज पुतळा चौक, आर्वी नाका चौक, धुनिवाले मठ, आरती चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे समारोप हा करण्यात आला रेल्ली 11/00 वा सुरु करून 12/00 वा समारोप करण्यात आलंl

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये