उच्च शिक्षित राहुल करतोय ब्रम्हपुरी शहरात नागरिकांचे मनोरंजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रम्हपुरी:- नागभीड तालुक्यातील सुलेझरी येथील राहुल प्रबुद्ध पेटकर वय ५८ असुन अनेक वर्षे पासून विविध शहरात जाऊन तो आपल्या विविध प्रकारच्या कलेतून नागरिकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. काल २९ संप्टेंबर २३ शुक्रवार ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरीचा महाराजा गणपती विसर्जन सुरू असताना.
नागभीड तालुक्यातील सुलेझरी येथील राहुल पेटकर यांनी विविध प्रकारचे वादक व गायन करून नागरिकांचे मनोरंजन करताना बघायला मिळले. यांची कला बघण्यासाठी असंख्य नागरिकांची गर्दी जमा झाली. सदर ची बातचीत केल्यानंतर राहुल पेटकर यांनी सांगितले की मी तीन विषयावर प्रोजग्रॅजवेट असुन सुलेझरी येथे माझ घर आहे. आणि शेती सुध्दा आहे. माझी शेती रेल्वे स्थानकापासून जवळ असुन करोडो रुपयांची आहे. पण मी शेती विकणार नाही. कारण आपल्या भागात एम. आय. डी. सी. अत्यंत आवश्यक आहे. अनेक बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळेल असी भावना व्यक्त केली.
या व्यक्तीला नागपूर येथे आपली कला दाखवण्यासाठी उच्च शिक्षित राहुल यांनी डोक्यावर बाटल व उलटा चालताना असताना नागपूर येथील पत्रकारांनी भिकारी शब्दाचा उल्लेख केल्याने मनाला दुख होतो आहे. तरी पण माझ्या कलेची दखल घेतली त्यांचे मी आभारी असल्याचे सांगितले. ब्रम्हपुरी शहरात अनेक वर्षे पासून आपली कला दाखविण्याचे प्रयत्न करण्याचे धाडस उच्च शिक्षित राहुल पेटकर करित आहेत.राहल पेटकर उच्च शिक्षित असुन फटाफट इग्रंजी सुध्दा बोलतो आणि नागरिक बघत असतात. आता प्रश्न पडतो की ऐवढा इग्रंजी बोलणारा व श्रीमंत माणूस असा कसा काय? पण नियतीचा खेळ वेगळच असते.नागभीड येथील उच्च शिक्षित असुनही राहुल पेटकर यांना नोकरी मिळाली नाही. आणि पुढील आयुष्य या प्रकारे जगण्याचा धाडसी निर्णय घेतला.