ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंनगावचा विद्यार्थी सार्थक डोईफोडे राज्यात दुसरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 लीप फॉरवर्ड च्या टेक्निकने इयत्ता दुसरीची मुले सहज इंग्रजी शब्दांचे वाचन,स्पेलिंग तयार करणे, जवळपास 3000 शब्दांचे पाठांतर या गोष्टी करतात.पटावरील एकूण 51 मुलांपैकी 40 मुलांचे लीप फॉरवर्ड वर्ड पॉवर चॅम्पयनशिप साठी रजिस्ट्रेशन केले विविध राऊंड मधून त्यातील 4 विद्यार्थी स्टेट सेमी फायनल साठी (महाराष्ट्रातील 15 विद्यार्थ्यांमधून) सिलेक्ट झाले.त्यानंतर या 4 विद्यार्थ्यांपैकी सार्थक बाबासाहेब डोईफोडे हा स्टेट फायनल साठी (महाराष्ट्रातील 6 विद्यार्थ्यांमधून)सिलेक्ट झाला. 26 मार्च 2023 रोजी लीप फॉरवर्ड ची मुंबई टीम श्रुती मॅडम,अपर्णा मॅडम व जयेश सर यांनी जि.प.म.प्रा.शाळा, सिनगाव जहागीर येथे येऊन सार्थक ची फायनल टेस्ट घेतली.

सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता दुसरीच्या 6 विद्यार्थ्याची टेस्ट लीप फॉरवर्ड कडून त्या त्या शाळेत जाऊन घेतली जात होती.काही वेळातच राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये सार्थक बाबासाहेब डोईफोडे राज्यातून दुसरा आल्याचे घोषित करण्यात आले,सार्थक ने सुद्धा संधीचं सोनं करण्यासाठी खूप मेहनत घेतली.सार्थक सोबत सेमी फायनल राऊंड मध्ये असलेल्या आराध्या पठाडे,भक्ती ताठे,श्रुती वायाळ यांनी सुद्धा सार्थक चा अभ्यास घेण्यात खूप मदत केली.सार्थक ची आई व बाबा यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे स्वागत करून सार्थक कडून खूप तयारी करून घेतली.

12 एप्रिल ला मुंबई ला ग्रँड फायनल मध्ये सार्थक,त्याचे पालक व मार्गदर्शक या नात्याने संदीप कायंदे व शुभांगी मुसळे यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे,लीप फॉरवर्ड टीम कडून सार्थक ला स्कूल बॅग,वॉटर बॉटल, टिफीन बॉक्स, स्टेशनरी किट, सर्टिफिकेट प्राप्त झाले.मुंबईला त्याला सायकल सुद्धा मिळणार आहे. मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक  रामप्रसाद केवट, विलास वाघ, शिवानद लहाने अहमद मुला संदीप कायंदे व शिशिका शुभांगी मुसळे, शोभा मंडळकर, सुनीता नागरे, रंजना देशमुख, अर्चना ताठे, शुभांगी मुसळे यांचा सर्वांचा सार्थक च्या यशात मोलाचा वाटा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये