ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरवस्तीतील गॅरेज आगीत भस्मसात

आगीने सात ते आठ लाखांचे नुकसान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहरातील दाट लोकवस्तीच्या भाग असलेल्या रामनगर परिसरात असलेल्या हिंदुस्तान मोटर्स नामक गॅरेजला सकाळी 7 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीस आली असुन ह्या आगीत गॅरेज मधील सर्व साहित्य जळुन राख झाले असुन ह्यामुळे गॅरेज संचालकांचे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितनुसार गॅरेज जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. कचरा जळत असताना ही आग गॅरेज पर्यंत पोहचली व क्षणात ज्वलनशील पदार्थ असलेल्या गॅरेजला आगीने आपल्या विळख्यात घेतले.

दरम्यान परिसरातील काही व्यक्तींनी मालक शब्बीर अहमद ह्यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत गॅरेज मधील सर्व साहित्य जळुन राख झाले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये