ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसिल कार्यालय सिंदखेडराजा येथे लोकसभा निवडणुक आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व पत्रकारांची आढावा बैठक तहसील कार्यालय, सिंदखेड राजा येथे निवडणूक हॉलमध्ये 27 मार्च ला आढावा सभा घेण्यात आली सर्व पत्रकारांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, सिंदखेड राजा मतदार संघा बाबत तालुका निहाय माहिती देण्यात आली त्यामध्ये सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली,लोणार तालुक्यातील गावांबाबत माहिती सांगण्यात आली, मतदार लोकसंख्या बाबत सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या बाबत तालुका निहाय माहिती सांगण्यात आली.

 तसेच सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये असलेली मतदार संख्या,पुरुष,महिला,इतर स्त्री-पुरुष प्रमाण बाबत माहिती देण्यात आली. मतदार संख्या अंतिम झाल्यानंतर काही प्रमाणात वाढतील, सध्या आपल्याकडे सर्विस वोटर सैनिक क्षेत्रातील कर्मचारी 1063 आहेत,85 वर्षे वयांचे व्यक्ती 6197, दिव्यांग मतदार 2914 इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

24 सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये असलेले मतदान केंद्रा बाबत तालुक्यातील ग्रामीण भाग, शहरी भाग यामध्ये एकूण किती मतदार केंद्रे आहेत याबाबत माहिती सर्वांना देण्यात आली. सर्व मतदार केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी मतदान पथक कर्मचाऱ्यांचे नियुक्ती बाबत माहिती देण्यात आली, EVM /VVPAT मतदान यंत्र याबाबत तालुक्याला एकूण CU 420, एकूण BU 420, VVPAT 452 प्राप्त झाले आहेत याबाबत माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.

 तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी योजना व्यवस्था करण्यात आली आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे वाहन,प्रचार सभा रॅली करिता परवानगी देण्यात येणार आहे, यासाठी लागणारे संमती पत्र, जागा मालक,वाहन मालक,चालक यांची आवश्यक कागदपत्रे रॅली काढण्यासाठी पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक आहे.

 आदर्श आचारसंहिता पथक यांच्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.श्रीकृष्ण वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली FST, VST, SST, VVT टीम ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक संदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात आली आहे, सर्व कर्मचारी अधिकारी यांचे सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा येथे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे, दिव्यांग मतदारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहेत तसेच शौचालय पिण्याचे पाण्याची व्यवस्था याबद्दल ही मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यात येणार आहे याबद्दल माहिती दिली.

 निवडणुकीबाबत पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत जसे की दारूबंदी, गाड्यांमध्ये येणारा पैसा याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याकरिता स्वीय पथक नियुक्त करण्यात आले आहे, तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी गावनिहाय काही उपक्रम राबवता येतील का याचा सुद्धा आढावा घेतला.

 सभेला तहसीलदार सिंदखेडराजा सचिन जैस्वाल, गटविकास अधिकारी सिंदखेड राजा डॉ.श्रीकृष्ण वेणीकर, मा. गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश माहोर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंदखेडराजा शेळके देऊळगाव राजाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे उपस्थित होते.

 पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकार बांधवांनी काही सूचना सांगितल्या, त्यातील काही सूचनावर अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला कळवले. तसेच पत्रकार बांधवांना अजून काही सूचना असल्यास तसेच निवडणूक संबंधी नव्या येणाऱ्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचतील याची दखल घेण्यात येईल असे कळविले व पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये