ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

        जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त दिनांक 20 मार्च ते दिनांक 27 मार्च पर्यंत श्री भगवान जिव्हेश्वर मंदिर खडकपुरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण चे आयोजन करण्यात आले होते.दररोज सकाळी काकडा भजन, दुपारी गाथा पारायण, सायंकाळी हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन संपन्न झाले.

या हरिकीर्तनामध्ये हभप संत चरणदास निकम गुरुजी, नारायण महाराज पिंपळे, लक्ष्मण महाराज कव्हळे, प्रकाश महाराज वाघ, सदानंद महाराज उबाळे, अनिरुद्ध महाराज शिरसागर व काल्याचे किर्तन ह भ प जनार्दन महाराज बोचरे यांचे झाले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

       या सप्ताहाचे आयोजन ह भ प गणेश महाराज पुंडलिकराव फुलझाडे अध्यक्ष जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ट्रस्ट देऊळगाव राजा तथा समस्त भक्तगण टाळकरी वारकरी सेवेकरी यांनी केले.विशेष सहकार्य श्री चौंडेश्वरी पंच मंडळ / नरेंद्र स्वामी महाराज भजनी मंडळ, भगवान जिव्हेश्वर मंदिर ट्रस्ट, विठ्ठल रुक्मिणी मंदिर भजनी मंडळ मृदुंगाचार्य – गायनाचार्य – टाळकरी – भक्तगण आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये