ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार फोटो ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळख पत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळख पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ई-पिक)  देण्यात आलेले आहे ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जरी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदारांना जरी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे एकुण 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. तर प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी केवळ त्यांचा मुळ पासपोर्ट आवश्यक राहणार आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘फोटो व्होटर स्लीप’ ऐवजी ‘मतदार माहिती चिठ्ठी’ मतदानाच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस अगोदर वितरीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही.   

            चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नियुक्त सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्षांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये