ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

टोल प्लाजा जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी पासून तीन किलोमीटर अंतरावरील खरबी टोल प्लाजा जवळ आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार झाल्याचे आढळून आले.

सविस्तर हकीकत याप्रमाणे आहे की, यातील मृतक महिला नामे सौ.मनोरथा शांताराम बावनथडे वय ६० रा. खरबी ही मनोरुग्ण असल्याने ती केव्हाही घरून निघून जायची व केव्हाही घरी परत यायची. मृतक महिला हीस  अन्नपूर्णा हॉटेल ते टोल प्लाझा च्या जवळ कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, हयगयीने निष्काळजीपणाने चालवून पहाटे च्या सुमारास जोरात धडक देऊन पसार झाला.

अपघातात मृतकच्या अंगावरून वाहन गेल्यामुळे तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याने ती जागीचं मरण पावली.फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून अज्ञात वाहन चालका विरोधात अप. क्र.१८४/२०२४ कलम ३०४(अ) २७९ भादवि सहकलम १८४/१३४ मोहा का अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घटनास्थळी ब्रह्मपुरी येथील पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार तपास अधिकारी बालाजी चव्हाण व सह पोलीस निरीक्षक नागलोत यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जीट्टावार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये