ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. ऍड अंजली साळवे यांनी नाकारली लोकसभेची अपक्ष उमेदवारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपुर :- २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारीची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ऍड अंजली साळवे यांनी नाकारली असून “मी महाविकास आघाडीच्याच उमेदवारा सोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत धानोरकर व वडेट्टीवार यांच्यात रस्सीखेच सुरू असतांनाच अपक्ष उमेदवार म्हणून ओबीसी जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ ऍड अंजली साळवे यांना अपक्ष उमेदवारी देऊन चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची ऑफर आली असल्याचे सूत्रांद्वारे कळले.

    चंद्रपूरच्या राजकारणात माजी आमदार स्व.एकनाथ साळवे यांचे कार्य असून डॉ ऍड अंजली साळवे या त्यांच्या पुतणी आहेत. त्या तालुक्यातील बामणी गावच्या असून उच्च शिक्षित व सामाजिक कार्यासोबतच त्यांना राष्ट्रीय स्तरावर कामाचा अनुभव आहे. तसेच जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या व डॉ ऍड अंजली साळवे यांनी ओबीसी जनगणने बाबत संसद, विधिमंडळ,न्यायालय व पाटी लावा अभियाना मार्फत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना अपक्ष उमेदवारी देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र चंद्रपूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारीची ऑफर मी नाकारत असून देशात लोकतंत्र व संविधान सुरक्षित रहावे व महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होऊ नये म्हणून मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नसून महाविकास आघाडीच्याच उमेदवारा सोबत खंबीर पणे उभी राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ऍड अंजली साळवे यांनी कळविले.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये