ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी इंडिया आघाडीतील कॉग्रेस च्या अधिकृत उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर उद्या नामांकन अर्ज दाखल करणार

चांदा ब्लास्ट

आमदार प्रतिभा धानोरकर यांना भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षा तर्फे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर झाली असून इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उद्या दि. 27/03/2024 रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहे.

इंडिया आघाडी च्या उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी प्राप्त झाल्याने उद्या सकाळी 11.00 वा. कोहीनुर ग्राऊंड, दादमहल वार्ड, चंद्रपूर येथून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार, माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विष्वास नांदेकर, राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, संदीप गिÚहे जिल्हाध्यक्ष उ.बा.ठा. गट, दिलीप चौधरी मराठा सेवा संघ, सोहेल शेख जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी, अरुण भेलके सी.पी.एम नेते, प्रकाश रेड्डी सी.पी.आय. नेते, रविंद्र उमाटे आयटक नेते, मयूर राईंचवार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, संजय देरकर यासह अनेक इंडिया आघाडीतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11.00 वा. हि रॅली कोहीनुर मैदानाजवळून गांधी चौक मार्गे जाणार असून सदर रॅलीचा समारोप न्यु इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे होणार आहे.

यानंतर दु. 3.00 वा. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये