ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण प्रगणक आले दारी

चुकीची माहिती न तारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील मुस्लिम वइतर नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी शासनाचे प्रगनक आपल्या दारी येत असून मुस्लिम समाजामध्ये सर्व निर्माण झाला आहे यामुळे चुकीची माहिती नोंद होण्याची अधिक शक्यता असल्याने प्रगनक शासनाने नियुक्त करून दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षण माहिती ऑनलाईन नोंद केल्या जाणार आहे मुस्लिम समाजाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सबळ पुरावे तसेच निश्चित त्याच प्रवर्गातील असल्याचाआधार असल्यास मागासवर्गीय प्रवर्गातील जाती वर्गवारीनुसार बटन वर क्लिक करण्यास सांगावे यामध्ये मराठा समाजाकरिता 154 प्रश्न विचारले जाणार असून मुस्लिम समाजाला अल्प प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारले जात आहे.

इतर मागास प्रवर्ग वगळता सर्व मुस्लिम खुल्या प्रवर्गात असल्याने मुस्लिमांना शिक्षण संरक्षण आरक्षण हे मुस्लिम समाजाच्या आर्थिक मागास धरतीवर देण्याचा लढा सुरू असून न्या सच्चर समिती डॉ मेहमूद रहमान समितीशिफारसीनुसार हे सर्वेक्षण नसल्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार इतर मागास प्रवर्ग यातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे शासकीय अधिकारी किंवा प्रगनक यांना मुस्लिम समाजाने अचूक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच निर्माण झालेला संभ्रमव गैरसमज न करता मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गातील आरक्षित वर्ग सोडून इतर खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी चुकीची नोंद करू नये असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव सय्यद आबिद अली यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये