ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे विनामूल्य डोळे तपासणी शिबिर संपन्न

९२रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामला रवाना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   लायन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा,लायन्स क्लब चंद्रपूर, महाकाली महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर, केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली आयोजित तपासणी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आज ११ फेब्रुवारी २०२४ रोज रविवार ला दुपारी ११ ते ०३ या वेळात विश्वशांती विद्यालय सावलीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.

मागील १७ वर्षापासून मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून महावीर इंटरनॅशनल सावली तर्फे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्याची परंपरा कायम ठेवत याही वर्षी यशस्वीपने आयोजन करण्यात आले. आयोजित शिबिरात एकुण ४५० च्या जवळपास रुग्णाची शिबिरात नोंदणी करून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली,त्यासाठी तज्ञ डॉक्टर अजय शुक्ला डीन मेडिकल कॉलेज सेवाग्राम व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनात रुग्णाची तपासणी करुन १५४ रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.आज लगेचच ९२ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे रवाना करण्यात आले. उर्वरित रुग्णांना दोन दिवसात पाठवणार असून महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे आयोजक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिबिर घेऊन सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यांच्या कार्याची तालुक्यात इतरत्र कौतुक केले जात आहे.

या शिबिराला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. हा शिबिर यशस्वीतेसाठी महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे मार्गदर्शक प्रकाश खजांची,तालुका अध्यक्ष मनोज ताटकोंडावार,सचिव राहुल मेरुगवार,प्रफुल बुट्टे,संतप्रकाश शुक्ला,अजय पोटवार,अशोक पोटवार,प्रा.अरुण राऊत,रवी ताटकोंडावार,किशोर संगिडवार,राजेंद्र रक्षणवार,जगदीश बनसोड,किरण आकुलवार,अजय पोहनकर,प्रवीण झोडे,प्रा.शेखर प्यारमवार,गुड्डू बांगरे,अमोल तिग्गलवार, महेश चौधरी,इत्यादी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये