ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल लाभार्थ्यांचा निधी मंजूर करा!

पालकमंञी यांची इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंञी अतुल सावे यांचेकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतंर्गत व अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतंर्गत गरजू लोकांना‎ घरकुल मिळावे यासाठी सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वित्तीय वर्षामध्ये आकांक्षीत जिवती व सावली तालुक्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत योजनेतून १०२४ घरकुल व पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतून आकांक्षीत जिवती तालुक्यातील एकूण १४८ घरकुलांना जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिली आहे व सदर प्रस्ताव संबंधित मंञालयाचे विभागात सादर केले असून, दोनही योजनेतून जिल्हा निवड समितीने प्रशासकीय मंजूरी दिलेल्या घरकुल लाभार्थी यांना निधी मंजूर व्हावा.

यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी सदर विभागाचे मंञी अतुल सावे यांचेकडे मागणी केली असता, सदर घरकुलांना सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीने लवकर निधी मंजूर होणार असल्याचे जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजयुमो चे जिल्हा महामंञी महेश देवकते यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये