ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होळीच्या सणाला दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर असेल पोलिसांची नजर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

  होळी आणि धुलीवंदन हा पारंपारिक सण आनंदाच्या, गव उत्साहाचा आणि एकमेकांवर रंग उधळण्याचा हा एक प्रमुख आणि आनंदी सणापैकी एक सण आहे अशा या आनंदाचा सणाला गालबोट लागू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता दारू पिऊन दंगामस्ती व वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची नजर असल्याचे पाथरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सांगितले आहे. ब्रिटिशकालीन पाथरी पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला ठाणेदार मिळाले असता पदभार स्वीकारताच रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या असल्याने अनेक अवैद्य धंद्यावाल्यात धास्ती निर्माण करून आपली छाप सोडली यादरम्यान होळी हा सण एकमेकास रंग उधळन्याचा व वाईट विचारांच्या नाश करण्याच्या सण असतो परंतु काही नागरिक अती मद्यप्राशन करुन वाहने सुसाट चालवीत असतात तसेच दंगा मस्ती करीत असतात अशा व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात येणार असून आदर्श आचार संहिता तसेच शांतता व सुव्यवस्था भंग होणार नाही यांची नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ठाणेदार यांनी केले आहे.

      दारू पिऊन वाहन चालवीत असताना आपला तसेच दुसऱ्या व्यक्तींनाही प्राण गमावा लागतो त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत होळी आणि धुलीवंदन हा सण शांततेत साजरा करावा

संगीता हेलोंडे, ठाणेदार पो. स्टे. पाथरी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये